गावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य किंवा पदाधिकारी वगळता ग्रामपंचायतीवर स्थानिक पोलिस पाटील हेच प्रमुख दावेदार

Ad 1

राजगुरुनगर-मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर गावचे गाव कारभारी म्हणून गावचे स्थानिक पोलीस पाटील प्रशासक म्हणून हा एकच पर्याय उपलब्ध आहे कारण covid-19 च्या संकट काळात तसेच इतर वेळेत गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे याची अतिशय चांगल्या प्रकारे व प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत आहेत. सध्या खेड तालुक्यात 91ग्रामपंचायतीच्या मुदत संपत आहे,तरी पोलीस पाटील कार्यरत आहेत विशेष म्हणजे सर्व पोलीस पाटील उच्चशिक्षित आहेत व त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे.

_खेड तालुक्यातील सप्टेंबर अखेर बऱ्याच ग्रामपंचायत उदा. राष्ट्रपती राजवट सारख्या होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे उत्तम प्रशासक म्हणून आपण पण गावचे पोलीस पाटील यांच्याकडे गावचा गाव कारभार चालवण्याचा हा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे._

पोलीस पाटील हा गावातील सुव्यवस्था, शांतता, व गावातील पूर्ण असलेला माहिती असलेला व सध्या चे नवीन पोलीस पाटील उच्च शिक्षित आहे, तरी शासनाने याचा विचार करावा.
आत्माराम डुंबरे पाटील
उपाध्यक्ष पोलीस पाटील संघटना खेड तालुका.