हनुमान नगर परिसरात सोडियम क्लोराइड जंतुनाशक फवारणी

अमोल भोसले

हनुमान नगर मित्र मंडळ व ट्रस्ट यांनी आज पासून परिसरात सोडियम हायड्रोलिक जंतूनाशक फवारणी सुरू केली आहे. गेल्या वर्षी ही मंडळाने लॉकडाउन कालावधीत हनुमान नगर परिसरात सोडियम क्लोराइड जंतुनाशक फवारणी केली होती व शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू व्यक्तींना अत्यावश्यक अन्नधान्याचे वाटप केले होते.

मंडळाचे सचिव खजिनदार राष्ट्रवादी सोशल मीडीया प्रशांत प्रकाश पवार यांनी माझे कुटुंब माझे जबाबदारी अंतर्गत हनुमान नगर भागात जंतुनाशक फवारणी सुरू केली आहे.गतवर्षी केलेल्या कार्याबद्दल तेजस फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने श्री प्रशांत प्रकाश पवार यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला होता.

हनुमान नगर भागात कोणती ही समस्या असली तरी हाकेला धावून येणारे नगरसेवक अभिजीत गणेश (तात्या)पाचर्णे सभापती बांधकाम समिती शिरूर नगरपालिका/ नगरसेवक यांनी फवारणीसाठी अत्यावश्‍यक पंप व सोडियम हायड्रोक्लोरिक मंडळाला भेट दिले. मंडळाच्या प्रत्येक कार्यासाठी अभिजित गणेश (तात्या) पाचर्णे यांचा मोलाचा वाटा असतो

Previous articleपै.गणेशभाऊ बोत्रे युथ फाउंडेशनचा नाणेकरवाडीतील पारसकर कुटूंबाला मदतीचा हात
Next articleजागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन परिसंवाद