पै.गणेशभाऊ बोत्रे युथ फाउंडेशनचा नाणेकरवाडीतील पारसकर कुटूंबाला मदतीचा हात

चाकण- खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथील कुंदा पारसकर यांच्या घराचे जुने पत्रे काढून नवीन पत्रे पै.गणेश बोत्रे युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून टाकण्यात आले.

कु़ंदा पारसकर यांच्या घराचे पत्रे तुटल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी घरात येत होते त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत होता. पासलकर यांच्या घरात कर्ता पुरुष नसल्याने त्यांना गळक्या घरात राहून हाल सोसावे लागत होते. पासलकर या़ंच्या कुटुंबाचे पावसाळ्यात होणारे हाल पै.गणेशभाऊ बोत्रे युथ फाऊंडेशनला समजल्यानंतर तातडीने त्या़ंच्या घरावरील जुने पत्रे काढून नवीन पत्रे टाकून देण्यात आले.यावेळी नाणेकरवाडीचे सरपंच संदेश साळवी, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव नाणेकर व इतर सदस्यांनी मदत केली.

पारसकर कुटूंबाला एकप्रकारे आधार देण्याचे कार्य पै.गणेशभाऊ बोत्रे युथ फाउंडेशनने केल्यामुळे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleनारायणगाव येथील ग्रामवैभव इमारतीच्या परिसरात अनधिकृतपणे उभारली टपरी
Next articleहनुमान नगर परिसरात सोडियम क्लोराइड जंतुनाशक फवारणी