लॉकडाऊन रद्द करून रोजगार,व्यवसाय चालु ठेवावेत,अन्यथा भुकबळी जातील अशोकराव टाव्हरे यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे मागणी

पुणे-कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाच्या ग्रामीण भागात घोषित केलेला लाॅकडाऊन मागे घ्यावा, प्रशासनाने जनजागृती, प्रबोधन,कठोर उपाययोजना कराव्यात ,परंतु सामान्यांचा रोजगार बुडवून भुकबळींची व्यवस्था करू नये अशी मागणी खेड तालुका भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्या वाढत चालली आहे. जवळपास चार महिने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.धनिक व्यावसायिक, शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी वगळता गोरगरिबांचे जिणे अवघड झाले आहे.पाच किलो धान्य व पाचशे रुपये देऊन महिना जाणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात दहा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. दि 4मे पासून शासनाने लाॅकडाऊन मध्ये शिथिलता आणली ,त्यापूर्वी दिड महिना सर्व नोकरी, व्यवसाय ठप्प होते.कुटंबाची गुजराण करण्यासाठी कोरोना सोबत घेऊन जगण्याशिवाय सामान्यांना पर्याय नाही. शासन आपत्कालीन स्थितीत कारवाईचा अधिकार बजावत असेल तर नागरिकांना लाॅकडाऊन मध्ये जगविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे अशी मागणी टाव्हरे यांनी केली आहे.

खेड तालुक्यात मागील पंधरा दिवस रूग्ण संख्या वाढून चारशेच्या जवळ पोहोचली आहे. पुणे जि.प.ने विप्रो कंपनीच्या जागेत उद्घाटन केलेले हिंजवडी येथील कोविड रूग्णालय स्टाफअभावी धुळ खात पडले आहे. वाढती रूग्ण संख्या पाहून कोणतेही नियोजन नाही. फक्त बैठका, घोषणा व प्रसिध्दी यातच मग्न आहेत.

खेडचे प्रांत संजय तेली यांनी कडक लाॅकडाऊन बाबतचे पत्र प्रसिद्ध केले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मधील रूग्णालयात ग्रामीण भागातील रूग्णांना दाखल करून घेताना त्रास होत आहे याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी उपाययोजना केल्या पाहिजेत.
लाॅकडाऊन ऐवजी जनजागृती करावी नियम न पाळून विनाकारण रस्ते व इतर ठिकाणी गर्दी करणारे उपटसुंभ असतील तर कठोर कारवाई करावी, परंतु पुर्वपदावर येत असलेले जीवन विस्कळीत करून भुकबळींना आमंत्रण देऊ नये या वस्तुस्थितीची जाणीव करून अशोकराव टाव्हरे यांनी सामान्यांना वेठीस न धरता योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

Previous articleचाकण परिसरातील शाळा व मंगल कार्यालय क्वारंटाईन सेंटर करण्याची राम गोरे यांची मागणी
Next articleपडद्यामागील कलाकारांना, नाट्य परिषदेकडून आर्थिक सहाय्य मिळावे – लक्ष्मिकांत खाबिया