चाकण परिसरातील शाळा व मंगल कार्यालय क्वारंटाईन सेंटर करण्याची राम गोरे यांची मागणी

Ad 1

चाकण : खेड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांसाठी कोरोटाईन सेंटरसाठी चाकण परिसरातील मराठी शाळा व मंगल कार्यालय येथे उपलब्ध करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे चाकण शहराध्यक्ष राम गोरे यांनी चाकण नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी यांना निवेदन देवून केले आहे.

ज्याअर्थी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू मुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेला आहे. तसेच करून विषाणूचा प्रसार चाकण नगरपालिका हद्दीत झपाट्याने वाढत आहे covid-19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनात आलेले आहे. म्हाळुंगे येथील covid-19 सेंटर या ठिकाणी रुग्णांना बॅड उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांना घरीच वाट पहावी लागत आहे.
त्या अनुषंगाने चाकण नगरपरिषद हद्दीतील व आजूबाजूच्या परिसरातील शाळा व मंगल कार्यालय हे सौम्य लक्षणे असलेल्या covid-19 रुग्णांकरिता उपलब्ध करून घेण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी राम गोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चाकण शहराध्यक्ष, नगरसेवक विशाल नायकवाडी, मोबीन काझी अल्पसंख्याक अध्यक्ष चाकण शहर,उद्योजक राहुल नायकवाडी उपस्थित होते.