पडद्यामागील कलाकारांना, नाट्य परिषदेकडून आर्थिक सहाय्य मिळावे – लक्ष्मिकांत खाबिया

अमोल भोसले,उरुळी कांचन —प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुणे शहरातील नाट्य, लावणी निर्माते, बॅकस्टेज कलाकार, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई यांच्याकडून मिळाली नाही. निर्माते आणि कलाकार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे आजीव सभासद आहेत. या सर्व कलाकारांसाठी मदतीचा हात द्यावा अशी मागणी पुणे नाट्य परिषदेचे सभासद लक्ष्मीकांत खाबिया यांनी केली.
पुणे नाट्यपरिषद शाखेच्या ८९ पडद्यामागील कलाकारांनी मध्यवर्ती शाखेमार्फत नाट्यपरिषदेच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रसाद कांबळीयांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा गेली महिना-दीड महिना आम्ही सर्व करतोय पण त्या पाठपुराव्याला आद्यपही कांबळी यांनी दाद दिलेली नाही. वास्तविक पाहता ८९ लोकांना प्रत्येकी अडीच हजार रुपये आर्थिक मदत येणे गरजेचे होते. परंतु ती मदत अद्यापही पडद्यामागील कलाकारांपर्यंत ती मदत पोहोचली नाही. असेही खाबिया यांनी सांगितले.

Previous articleलॉकडाऊन रद्द करून रोजगार,व्यवसाय चालु ठेवावेत,अन्यथा भुकबळी जातील अशोकराव टाव्हरे यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे मागणी
Next articleगावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य किंवा पदाधिकारी वगळता ग्रामपंचायतीवर स्थानिक पोलिस पाटील हेच प्रमुख दावेदार