सावरदरी गाव दहा दिवस कडकडीत बंद

चाकण- सावरदरी ग्रामपंचायत एमआयडीसीतील कंपन्या मध्ये जावून अधिकारी व कर्मचारी यांच्या कोरोना परिस्थितीचा ग्रामपंचायतीने आढावा घेऊन आला.तसेच सर्व कर्मचारी वर्गाचे RTPCR Test करुन घेण्याच्या सुचना दिल्या आहेत व सुचनांचे पालन न केलेल्या कपंनी वर ग्रामपंचायत प्रशासनाकडुन कठोर कारवाई करण्यात येईल अशा सुचना देण्यात आल्या.

सावरदरी गावचे ग्रामदैवत आई गोंधळाजाई मातेचा उत्सव रद्द करण्यात आला

तसेच उद्या दि ०५ मे २०२१ पासून दि १५ मे २०२१ पर्यंत सावरदरी ग्रामपंचायत च्या हद्दीतील सर्व गाव कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

या वेळी उपस्थित सरपंच भरत तरस, उपसरपंच श्री संदिप पवार, पोलिस पाटील श्री राहुल साकोरे पा,प्रा श्री संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते श्री उत्तममामा शेटे उपस्थित होते.

गावात सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास देखील बंदी घातली आहे अत्यावश्यक सेवा सोडुन सर्व बंद राहील तसेच सकाळी ७:०० ते ११:०० पर्यंत किराणा दुकान भाजीपाला फळे व दुध ही दुकाने चालू राहील यांची नोंद सर्वांनी घ्यावी व विनाकारण कोणी बाहेर फिरू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleसावरदरी ग्रामपंचायतीने कंपन्यामध्ये जाऊन घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
Next articleआयपीएल २१ रद्द नाही ; आयपीएलच्या अध्यक्षांची सर्वात मोठी माहिती