सावरदरी ग्रामपंचायतीने कंपन्यामध्ये जाऊन घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

चाकण- सावरदरी ग्रामपंचायत एमआयडीसीतील कंपन्या मध्ये जावून अधिकारी व कर्मचारी यांच्या कोरोना परिस्थितीचा ग्रामपंचायतीने आढावा घेतला. तसेच आज दि ०५ मे २०२१ पासून दि १५ मे २०२१ पर्यंत सावरदरी ग्रामपंचायत च्या हद्दीतील सर्व गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .तसेच सर्व कर्मचारी वर्गाचे RTPCR Test करुन घेण्याच्या सुचना दिल्या आहेत व सुचनांचे पालन न केलेल्या कपंनी वर ग्रामपंचायत प्रशासनाकडुन कठोर कारवाई करण्यात येईल अशा सुचना देण्यात आल्या आहे.

यावेळी भरत तरस, उपसरपंच श्री संदिप पवार, पोलिस पाटील श्री राहुल साकोरे पा,प्रा श्री संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते श्री उत्तममामा शेटे उपस्थित होते.गावात सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास देखील बंदी घातली आहे अत्यावश्यक सेवा सोडुन सर्व बंद राहील तसेच सकाळी ७:०० ते ११:०० पर्यंत किराणा दुकान भाजीपाला फळे व दुध ही दुकाने चालू राहील यांची नोंद सर्वांनी घ्यावी व विनाकारण कोणी बाहेर फिरू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleजनावरांची चोरी करणारी अट्टल टोळी जेरबंद
Next articleसावरदरी गाव दहा दिवस कडकडीत बंद