कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावरवाडी ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

आंबेगाव तालुक्यातील  गावरवाडी येथे सालाबाद प्रमाणे, यंदाच्या वर्षी ही श्री हनुमान जयंती अतीशय साध्या पध्दतीने साजरी झाली.त्याच निमित्तांने, आरोग्य विषयक जनजागृती व्हावी यासाठी, समस्त ग्रामस्थ मंडळाने गावात अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम प्रतीकात्मक स्वरूपात साजरा करत शेवटी श्री हनुमान मंदिरासमोर दहीहंडी फोडण्यात आली.

          यावर्षी संपूर्ण जगावर कोरोनाच्या महाभयंकर संकट असल्यामुळे माझं गाव माझी जबाबदारी या ध्येयाने गावरवाडी येथे कोरोना विषयक जनजागृती सप्ताह  मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत व शासकीय नियमांचे पालन करत आयोजित करण्यात आला होता. कोरोना प्रतिबंध आपण करू शकतो घाबरु नका , काळजी घ्या आशा घोषणा यावेळी गावरवाडी ग्रामस्तांनी अखंड हरिनाम सप्ताह मधून दिल्या

           यावेळी काळेवाडी-दरेकरवाडी ग्रुप गावरवाडीचे तंटामुक्तीचे उपाध्यक्ष  दिनकरराव फदाले सचिन गावडे ,कृष्णा फदाले , किशोर गावडे , नवनाथ फदाले,अनिल गावडे,  शरद पोखरकर ,गुलाब गावडे  ,निवृत्ती पोखरकर , बबन फदाले, आशोक गावडे ,विणायक गावडे , बबन तोत्रे , कैलास गावडे आदी मान्यवर यांनी सहभागी होवून गावातील प्रत्येक घरात मास्क व सॅनिटायझरचे वाटप करत, कोरोना विषयक जनजागृती व्हावी म्हणून प्रत्येकाला माहिती पत्रक देण्यात आले असून अजाराला घाबरु नका योग्य वेळी उपचार घ्या तसेच सरकारी हॉस्पीटल व खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे १८ वर्षावरील सर्वांनी अवश्य लसीकरण करावे तसेच गावातून निर्जतुकीकरण करण्यात येईल व आवश्यक असल्यास आयसोलेशन वॉर्डचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीकाळेवाडी-दरेकरवाडी ग्रुप गावरवाडीचे तंटामुक्तीचे उपाध्यक्ष  दिनकरराव फदाले यांनी दिली. गावरवाडी ग्रामस्तांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून हा उपक्रम  सर्व गावांनी राबवला तर नक्कीच कोरोना रुग्ण संख्या अटोक्यात येईल

Previous articleकोरोनाला हद्दपार करुया घरी रहा.. सुरक्षित रहा आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने
Next articleगावगाडा चालवायचा कसा……?                          विकास दादा ठाकुर