कोरोनाला हद्दपार करुया घरी रहा.. सुरक्षित रहा आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने

अमोल भोसले,पुणे

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शालेय शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत धनंजय मदने यांनी सहभाग घेऊन अनेक पारितोषिके मिळविली आहेत. तसेच सामाजिक कार्याची आवड असल्याने विविध स्पर्धा आयोजित केल्या. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे हे ओळखून ते स्वतःच्या वाढदिवसानिमित्त घरासमोर वृक्षारोपण करून एक अनोखा संदेश समाजापुढे उभा करणार आहेत.

तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की प्रशासनाला सहकार्य करा. डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, लोकप्रतिनिधी, स्थानिक पातळीवरचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महापौर आणि नगरसेवक, सफाई कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी हे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने दिवसरात्र झटत आहेत..
कोरोनाला घालवू, घरी रहा.. सुरक्षित रहा व आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवा आणि स्वतः ची काळजी घ्यावी. त्यामुळे आपण सर्वांनी काही दिवस घरातच थांबावे. असे आवाहन धनंजय मदने यांनी नागरिकांना केले आहे.

Previous articleधनगरवाडीत बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यु
Next articleकोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावरवाडी ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम