एक लढवय्या आमदार अशोक पवार

अमोल भोसले, उरुळी कांचन —प्रतिनिधी

शिरूर—हवेली तालुक्याच्या राजकीय पटलावर ‘अभिनव आणि भरीव’ अशा विकासाचं पहिलं पाऊल ज्यांच्या रुपानं पडलं, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना न्हावरा चेअरमन तथा आमदार, अॅड्.अशोक रावसाहेब पवार हे आज कोरोनाच्या परस्थितीत सातत्यानं जनमाणसांमध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजाऊन घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रश्न पाण्याचा, विजेचा, रस्त्याचा, दवाखान्याचा वा कोणताही असो, त्याचं एकच उत्तर आमदार अशोक पवार.

आज भितीदायक वातावरण असतानाही आमदार अशोक पवार थांबले नाहीत. एक लढवय्या आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. गरजूंना किराणा मालाचे किटस्, सॅनिटायझर यांचे वाटप केले. कर्मचारी, आरोग्य अधिकारी यांनाही मास्क, हॅन्डग्लोज आदिंचे वाटप केले.

सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात त्यांचा कोणीही हात धरु शकत नाही. वेळप्रसंगी, ते खडे बोल सुनावतील पण स्वतः बरोबर इतरांची काळजी घेण्यात ते कमी पडणार नाहीत.

सामान्य जनतेची काळजी घेत असताना, कार्यकर्त्यांचं प्रेम, आदर, निष्ठा असल्यामुळे कार्यकर्त्यांनाही त्यांची काळजी वाटणं साहजिकच आहे. पण अशोक पवार हे शिस्तप्रिय व्यक्तिमत्वं आहे. त्यांच्याकडे कसलाही बेजबाबदारपणा चालत नाही.

Previous articleजुन्नर तालुक्यातील रुग्णांची संख्या पोहचली १८४ वर
Next articleपिंपळगाव आर्वी येथील युवा माजी सरपंचांचे कोरोना मुळे निधन