जुन्नर तालुक्यातील रुग्णांची संख्या पोहचली १८४ वर

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून आज दिनांक १४ जुलै रोजी १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या १८४ एवढी झाली असून सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

नारायणगाव – वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आज आलेल्या अहवालानुसार नारायणगाव येथे २ जणांचा कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच जुन्नर येथे ०२ रूग्ण, तर उंब्रज नं ०१, सितेवाडी, गोळेगाव, राजुरी, बेल्हे, बारव, वारूळवाडी, निमदरी व आर्वी येथे आज प्रत्येकी एक जणाचा कोरोना चाचणी अहवाल पाँझीटिव्ह आला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

आज अखेर जुन्नर तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण १८४ एवढी झाली आहे. आजपर्यंत ८१ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला असून एकूण सुमारे १०३ अँक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी हेमंत गरिबे व आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी नारायणगाव येथे निष्पन्न झालेल्या एका होलसेल मेडिकल वितरकाकडील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णा च्या सानिध्यात आलेल्या तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. या तिघांपैकी नारायणगाव मधील दोन रूग्ण व वारुळवाडी मधील एक रूग्ण भर वस्ती रहात आहेत.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या घटनेमुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व सरपंच योगेश पाटे यांनी केले आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये आज ६ हजार ७४१ कोरोणा बाधित रुग्णांची वाढ झाली असून राज्याची एकूण संख्या २ लाख ६७ हजार ६६५ एवढी झाली आहे. राज्यातील आज ४५०० कोरोणा बाधित रुग्ण बरे झाले आहेत.