पिंपळगाव आर्वी येथील युवा माजी सरपंचांचे कोरोना मुळे निधन

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव आर्वी चे माजी सरपंच निखिल उर्फ सोन्या गावडे यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. पुणे येथील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेली अनेक दिवस त्यांनी  मृत्यूशी केलेली झुंज  आज अखेर अपयशी ठरली. सरपंच पदाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये  पिंपळगाव मध्ये अनेक विकास कामे करण्यात त्यांचा पुढाकार होता.  एक मितभाषी  आणि  हसतमुख असणारे व्यक्तिमत्व  आज  आपणातून  गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे कोरोनामुळे तरुणपणीच झालेले निधन हे अनेकांना चटका लावणारे आहे.