ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात,एकाचा जागीच मृत्यू

राजगुरूनगर- जनावरांचा चारा आणण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाल्याची घटना खेड तालुक्यातील मिरजेवाडी येथे घडली आहे. मच्छिंद्र शिवाजी गावडे (वय,  ३०) असे मृताचे नाव आहे.

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथून चास येथे जनावरांना चारा आणण्यासाठी जात असताना मिरजेवाडी घाटात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Previous articleरुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सकारात्मक बातम्या प्रसिध्द करा – संदीप काटे
Next articleदेऊळगाव राजे येथे रक्तदान शिबिर संपन्न