देऊळगाव राजे येथे रक्तदान शिबिर संपन्न

दिनेश पवार,दौंड

विश्व जन आरोग्य सेवा समिती व मराठा सहकार्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळगाव राजे येथे रक्तदान शिबिर रविवार दि.25 एप्रिल रोजी संपन्न झाले, या शिबिरास परिसरातील युवक वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.

कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत, काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते देखील विधायक उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे दिसून येत आहे, याचाच एक भाग म्हणून राज्यातील रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी,प्रशासनाला देऊ साथ एकजुटीने करूया विश्व महामारीवर मात हे तत्व मनी बाळगून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू गिरमकर,संदीप पोळ यांच्यातर्फे रक्तदात्यांना मास्क,सॅनिटायजर चे वाटप करण्यात आले,सहभागी रक्तदात्यांना मा.सरपंच अमित गिरमकर,सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू गिरमकर,व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले,हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विकी दादा सूर्यवंशी, मिलिंद कड,सूरज कदम,रितेश कदम,पवन कदम,किरण कड,हरिभाऊ अवचर यांचे सहकार्य लाभले

Previous articleट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात,एकाचा जागीच मृत्यू
Next articleचाकण- तळेगाव चौकात भीषण अपघात; तीन युवकांचा जागीच मृत्यू