उरुळी कांचन रेल्वे स्टेशन ते पुणे सोलापूर रोड येथील साखरे पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन ऑनलाइन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते

उरुळी कांचन

उरुळी कांचन येथील रेल्वे स्टेशन ते पुणे सोलापूर रोड येथील साखरे पेट्रोल पंपापर्यंतचा हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली. या रस्त्याच्या कामाला १ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून सरपंच संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका कांचन, भाऊसाहेब कांचन यांच्या पाठपुराव्याने नुकतीच मंजुरी मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते ऑनलाइन भुमीपुजन नुकतेच संपन्न झाले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समितीच्या उपसभापती हेमलता बडेकर, सरपंच संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, मा.सरपंच दत्तात्रय कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, राजेंद्र कांचन, अमित कांचन, मयूर कांचन,  प्रियंका कांचन, अनिता तुपे, सुजाता खलसे, रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, शंकर बडेकर, सुनिल तांबे, अलंकार कांचन, रामभाऊ तुपे, विजय तुपे, सुभाष बगाडे उपस्थित होते.

Previous articleआळंदी पोलिस स्टेशनच्या वतीने २७ एप्रिलला रक्तदान शिबीराचे आयोजन
Next articleरुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सकारात्मक बातम्या प्रसिध्द करा – संदीप काटे