आळंदी पोलिस स्टेशनच्या वतीने २७ एप्रिलला रक्तदान शिबीराचे आयोजन

आळंदी : कोरोणाच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या अवाहनानुसार आळंदी पोलिस स्टेशनच्यावतीने दिनांक २७ एप्रिल रोजी फ्रुटवाले धर्मशाळा येथे सकाळी नऊ ते पाच यावेळत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.

कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असता रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले होते. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचे मोफत हिमोग्लोबिन आणि रक्तदाब (बीपी) तपासणी करण्यात येणार आहे, सर्व रक्तदात्यांना लाईफ ब्लड कार्ड आणि सन्मान पत्र देण्यात येईल.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आळंदी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे सहकार्य राहणार असून परीसरातील युवकांनी रक्तदान शिबिराला उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या सामाजिक कार्याला हातभार लावावा असे आवाहन आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि आळंदी ग्रामस्थांनी केले आहे.

Previous articleवारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी दिल्याने एकावर” नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Next articleउरुळी कांचन रेल्वे स्टेशन ते पुणे सोलापूर रोड येथील साखरे पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन ऑनलाइन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते