भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पिंपरी चिंचवड शहर शहरध्यक्ष राजेंद्र चिंचवडे यांचे वतींने व्यापारी बांधवांचे कोरोना तपासणी शिबिर संपन्न

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग तालेरा हॉस्पिटल यांच्या सहयोगाने चिंचवडे नगर येथे भाजपा व्यापारी आघाडी यांच्या वतीने चिंचवडे नगर, वाल्हेकर वाडी परिसरातील 413 व्यापारी बंधूचे कोरोना चाचणी तपासणी शिबीर भोलेश्वर मंदिर चिंचवडे नगर येथे मोठ्या उस्फुर्त प्रतिसादात पार पडले.

पोलीस प्रशासन व पालिका प्रशासन यांचे निर्देशानुसार कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी परिसरातील दुकानदार,व्यापारी, विक्रेते यांची कोविड तपासणी चाचणी बंधनकारक करण्यात आली असून नागरिकांच्या संपर्कात सर्वात जास्त व्यापारी बांधव येतात त्यामुळे सामाजिक भान ठेऊन भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने व्यापारी बांधवांसाठी खास तपासणी शिबीर आयोजित केले आहे .तरी सर्व व्यापारी बंधूनी स्वतःची कोरोना चाचणी तपासणी करून घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे व राष्ट्र कार्यात योगदान द्यावे असे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे यांनी सर्व व्यापारी बंधूंना आवाहन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी व्यापारी आघाडीचे सर्व पदाधिकारी, उपाध्यक्ष- विशाल वाणी, सरचिटणीस- सतपाल गोयल, कमलाकर गोसावी,हनुमंत हाके सर, क्रृष्णा वाघमारे आदींनी परिश्रम घेतले तसेच यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग, तालेरा हॉस्पिटल सर्व कर्मचारी वर्ग, डॉ.जॉन सुनील व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

Previous articleआमदार अतुल बेनके यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण
Next articleवाकळवाडीत २४५ नागरिकांचे लसीकरण