वाकळवाडीत २४५ नागरिकांचे लसीकरण

राजगुरूनगर- वाकळवाडी (ता.खेड) येथील पंचेचाळीस पेक्षा अधिक वय असणाऱ्या २४५ नागरिकांना बुधवारी (दि. २१)  करोना लस देण्यात आली आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव व ग्रामपंचायत वाकळवाडी यांच्या सहकार्याने आरोग्य अधिकारी डॉ. गोरे यांनी वाकळवाडीला २४५ लस उपलब्ध करून दिल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र वाळुंज यांनी दिली.

लसीकरण मोहिमेसाठी ग्रामपंचायत सदस्य रूपाली ताई पवळे यांनी गावांमध्ये घरोघरी जाऊन लोकांची लसीकरणाची नोंदणी करून सहभाग वाढवला

 

दरम्यान, गावातील ज्येष्ठ नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन लसीचा लाभ घेतला.या लसीकरण मोहीमेला पंचायत समितीचे सभापती भगवानशेठ पोखरकर,माजी सभापती अंकुश राक्षे, विजय शिंदे-पाटील यांनी भेट दिली.

यावेळी सरपंच मंगल कोरडे, नरेंद्र वाळुंज, सोपान भालेकर, रूपाली पवळे, धर्मराज पवळे, पांडुरंग कोरडे, आरोग्य कर्मचारी पन्हाळे मँडम, आशा वर्कर अनिता पवळे ,आरोग्य सेविका आदी उपस्थित होते.

Previous articleभारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पिंपरी चिंचवड शहर शहरध्यक्ष राजेंद्र चिंचवडे यांचे वतींने व्यापारी बांधवांचे कोरोना तपासणी शिबिर संपन्न
Next articleकुसगांव बु.ग्रामपंचायत च्या वृक्ष संवर्धन समिती स्थापन