डिवाईन जैन ग्रुप आणि श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदानाचा उपक्रम

अमोल भोसले,पुणे

कोरोना या महा भयंकर रोगाने थैमान घातल्याने सर्व आर्थिक आणि मानसिक स्थिती ढासळली आहे. अशा वेळी एक सामाजिक हातभार गरजूंना सेवा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे. आणि त्यानुसार “डिवाईन अन्नदान उपक्रम” चा प्रारंभ नुकताच सुरु करण्यात आला. या उपक्रमात पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील प्रत्येक गरजू व्यक्तींना रू ४५/- या अत्यल्प दरात ना-नफा ना-तोटा ने वाटप करण्याचे ठरविले आहे. आणि याचा विनियोग सर्व समाजातील गरजू ,पीडित आणि आर्थिक दुर्बल व्यक्तींना, तसेच ज्या स्थळी आहार मिळत नाही अशा सर्व बाबतीत आहार विनामूल्य वाटप करण्यात येईल. २६ एप्रिल पर्यंत सुमारे चार हजार अशा घटकातील व्यक्तींना विनामूल्य अशी सेवा देण्यात येणार आहे. आणि आमचे किमान १५,०००किंवा अधिक अशा व्यक्तींना देण्याचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमामधे भाग घेणार्या प्रत्येकाचा नेहमी प्रमाणे विश्वास आहे की, आमच्या संस्थेचे सर्व सदस्य पुर्ण सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या भागात आहाराचा पुरवठा करतील. या अनुषंगाने आणि विश्वासाने सर्व प्रायोजकांनी आर्थिक स्वरूपात खूप मोठे योगदान केले आहे. मंगळवार रोजी सकाळी या उपक्रमाचा प्रारंभ वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या शुभहस्ते वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी कर्तव्य करणारे सर्व पोलिस बांधवांना सदर आहार वाटप करण्यात आले. तसेच आज सायंकाळी हाॅस्पिटल मधील बाहेर गावातून आलेले रूग्ण आणि त्यांचे सोबतचे नातेवाईक तसेच बेघर असणारी कुटुंबे जे आज रस्त्यावर राहतात त्यांना आहार वाटप करण्यात आले.

या उपक्रमामधे सर्व रतनशेठ किराड, महेश शहा, हार्दिक शहा, तेजपाल ओसवाल, जब्बार तांबोळी, प्रतिक मुळे आणि अध्यक्ष संकेत शहा उपस्थित होते.

तसेच सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या भागात जर कोणी व्यक्ती आहाराशिवाय उपाशी रहात असेल असे कळविल्यास आमच्या संस्थेला त्वरित संपर्क साधावा. जेणेकरून आम्ही वेळेवर तेथे आहार पाठविण्याची व्यवस्था करू शकतो. असे आव्हान डिवाईन जैन गृप चे संस्थापक अध्यक्ष श्री. संकेत शहा यांनी केले आहे.
” अन्नदान सर्व श्रेष्ठ दान”
संपर्क: 9665700007 / 9822742790.

Previous articleट्रॅक्टरच्या अपघातात वडील व मुलाचा मृत्यू
Next articleकोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही समाधानकारक – डॉ. सचिन खरात