कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही समाधानकारक – डॉ. सचिन खरात

अमोल भोसले,उरुळी कांचन

हवेली तालुक्यामध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही समाधानकारक असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन खरात यांनी दिली.आज नव्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९५ असून आज २४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आजपर्यंत २४६६५ बाधित रुग्ण हवेली तालुक्यात सापडले. त्यापैकी २२३७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज मीतीला १८७८ रुग्ण विविध ठिकाणी औषधोपचार घेत आहेत आणि त्यापैकी ७ रुग्णांची स्थिती गंभीर आहे. सुमारे १२६ रुग्ण घरीच विलगीकरणात राहून औषधोपचार घेत आहेत. आज तालुक्यातील ५ रुग्ण कोरोणाने दगावले असून आज अखेर तालुक्‍यात सुमारे ४०२ कोरोनाने दगावले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ९१ टक्के इतके आहे तर मृत्यु दर १.६२ टक्के आणि तालुक्यातील सक्रिय कन्टेनमेंट झोनची संख्या ८०८ इतकी असल्याची माहिती डॉ.सचिन खरात यांनी दिली.

Previous articleडिवाईन जैन ग्रुप आणि श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदानाचा उपक्रम
Next articleदावडी गाव ३० एप्रिल पर्यंत कडकडीत राहणार बंद