कुटुंबातील नऊ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मृत्युमुखी पडलेल्या ८५ वर्षे वयाच्या आजीचे अंत्यसंस्कार केले प्रशासनाने

नारायणगाव (किरण वाजगे)

एकाच कुटुंबातील नऊ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याने घरात एकट्याच असलेल्या आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आजीचा अंत्यविधी करणार कोण हा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र नारायणगाव पोलिस स्टेशन, आरोग्य विभाग तसेच धनगरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मृत्युमुखी पडलेल्या ८५ वर्षीय आजीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना आज दिनांक अकरा रोजी धनगरवाडी (तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) येथे घडली. अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की धनगरवाडी गावातील मनीषा कैलास शेळके यांच्या सर्व कुटुंबातील नऊ सदस्य हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना लेण्याद्री केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्या सासूबाई लक्ष्मीबाई सखाराम शेळके वय ८५ या राहत्या घरी आज मृत्युमुखी पडल्या. प्राथमिक अंदाजानुसार त्यासुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अंदाज आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी कोणी नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व त्यांचे पोलिस कर्मचारी, डॉक्टर वर्षा गुंजाळ व त्यांचे आरोग्य कर्मचारी, सरपंच शेळके ताई, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच महेश शेळके व मोजक्या गावकऱ्यांच्या समवेत आजीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार विधी नंतर या परिसरात फवारणी करण्यात आली अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली

Previous articleनारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीमध्ये नियमांचे उल्लंघन करून हॉटेल चालू ठेवणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
Next articleमहाळुंगे येथील कोविड सेंटरमध्ये खेड तालुक्यातील रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्याची राम गोरे यांची मागणी