नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीमध्ये नियमांचे उल्लंघन करून हॉटेल चालू ठेवणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीमधील पुणे नाशिक महामार्गावरील कांदळी गावच्या हद्दीमधील हॉटेल माई प्युअर व्हेज, हॉटेल हरी पांडुरंग, हॉटेल कलश परमिट रूम अँड बियर बार या तीन हॉटेल चालकांवर आज कायदेशीर कारवाई करण्यात आली. हॉटेल चालू ठेवण्याची परवानगी नसताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की, हॉटेलमध्ये बसून जेवण्याची परवानगी नसताना ग्राहकांना रेस्टॉरंट सुरू ठेवून तसेच हॉटेलमध्ये बसून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत विचारणा केली असता या हॉटेल चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे ही कारवाई करण्यात आली. तसेच हॉटेलमध्ये काम करणारे कामगार, ग्राहक व इतरांनी तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझर ठेवणे , हात पाय धुण्यासाठी पाणी ठेवणे या व इतर सूचनांचे पालन केले नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे घोडे पाटील यांनी सांगितले.

यानुसार हरीश सिताराम शेट्टी (राहणार आनंदवाडी, वारूळवाडी) , प्रणील प्रकाश ढोबळे (राहणार कांदळी मूळ राहणार माणिकडोह) व राहुल शामराव भोर (राहणार भोरवाडी येडगाव) यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बी वाय लोंढे हे करीत आहेत.

दरम्यान सर्व हॉटेल चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा यापुढे देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिला आहे.