महाळुंगे येथील कोविड सेंटरमध्ये खेड तालुक्यातील रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्याची राम गोरे यांची मागणी

चाकण-महाळुंगे येथील कोविड सेंटरमध्ये खेड तालुक्यातील रुग्णांसाठी बेड राखीव ठेवावे व सेंटर मधील सुविधा व्यवस्थित पुरवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाकण शहर व चाकण शहराचे अध्यक्ष राम गोरे यांनी आमदार दिलीप मोहिते व प्रांंत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना  केली आहे.

खेड तालुक्यातील कोरोना संक्रमितांचा आलेख वाढला असून तालुक्यातील नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. रुग्णांचा आकडा तीनशेच्या वर गेला आहे
मे माहिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून  महाळुंगे (ता. खेड) येथील म्हाडा सदनिका मध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.या कोविड सेंटरमध्ये खेड तालुक्यातील रुग्णांसाठी बेड राखीव ठेवावे व सेंटर मधील सुविधा व्यवस्थित पुरवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाकण शहर अध्यक्ष अध्यक्ष राम गोरे यांनी आमदार दिलीप मोहिते व प्रांत तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
या कोविड सेंटर मध्ये कोरोनाग्रस्त बाधित व्यक्तींना स्वॅब घेण्यासाठी तसेच तिथे हे रुग्ण राहतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र येथे बाहेरील तालुक्यातील रुग्णांची संख्या जास्त  झाली आहे. परंतू, खेड तालुक्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे खेड तालुक्यातील महाळुंगे कोविड सेंटरमध्ये पिंपरी-चिंचवड परिसरातील व इतर तालुक्यातील रुग्ण कॉरन्टाइन केले आहे त्यामुळे खेड तालुक्यातील रुग्णांना घरीच कॉरन्टाइन करून घ्यावे लागत आहे, त्यामुळे खेड तालुक्यातील रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही घरी जाऊन हे रुग्ण कुटूंबातील लोकांना बाधित करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे खेड तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे तसेच कोविड सेंटरमधील काही बिल्डींग मधील लिफ्ट बंद असल्यामुळे रुग्णांना दहा मजले जिने चढून जावे लागते त्यामुळे रुग्णांना त्रास होण्याची शक्यता आहे सेंटरमध्ये नाष्टा, जेवण, गरम पाणी रुग्णाला वेळेवर मिळत नसल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले आहे तरी त्यांची व्यवस्था वेळेत करण्यात यावी अशी अश्या मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाकण शहर अध्यक्ष राम गोरे यांनी प्रांत तथा उपविभागीय अधिकारी व आमदार  यांना दिले आहे.

खेड तालुक्यातील रुग्णांना घरीच होम कॉरन्टाइन केलं जातं त्यामुळे हा आजार पसरण्याची खूप भीती आहे तसेच खेड तालुक्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढलेल्या रुग्णांना प्रशासनातर्फे घरीच होम कॉरन्टाइन केलं जातं त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. महाळुंगे (म्हाडा) येथील कोविड सेंटर मध्ये खेड तालुक्यातील रुग्णांसाठी राखीव बेड उपलब्ध करून द्यावेत व  तत्काळ ह्या कोविड केअर सेंटर मध्ये खेड तालुक्यातील रुग्णांना अँडमिट करून घ्यावे व पुढील उपचार चालू करावे, अशी मागणी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाकण शहर अध्यक्ष राम गोरे  यांनी निवेदनातून केली आहे.

Previous articleकुटुंबातील नऊ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मृत्युमुखी पडलेल्या ८५ वर्षे वयाच्या आजीचे अंत्यसंस्कार केले प्रशासनाने
Next articleआंबेगाव तालुक्यात एकाच दिवशी सापडले १० रुग्ण