शिरोली येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वृक्षारोपण व गरजुंना अन्नधान्याचे वाटप

राजगुरूनगर- शिरोली (ता.खेड जि.पुणे) येथिल मलगे वस्ती,ठाकर वस्ती येथे विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्तीचे औचित्य साधुन वृक्षारोपण तसेच अन्नधान्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन रिपाइंचे राज्य सचिव मा.हरेशभाई देखणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.


कोविड 19 चा प्रभाव वाढत असुन प्रशासनाने कोरोनाची साखळी मोडीत काढण्यासाठी लाँकडाउन केलेले आहे यासाठी आपणां सर्वानी सहकार्य करायचे आहे.गरजुंना अन्नधान्य मिळावे यासाठी ठाकरवस्ती येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे.तसेच विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारीत चातुवर्णीय व्यवस्थेला आपल्या ज्ञानाच्या वज्राने घाव घालुन समता प्रस्थपित केली.वृक्षापासुन आपणांला पाऊस,आँक्सिजन,सावली इ.मिळते.

यावेळी ते जात,धर्म,प्रांत,भाषा इ.पाहत नाही.ते सर्वांसाठी समान कार्य करते.म्हणजेच ते समतेचे प्रतिक आहे.म्हणुनच समतेचे दुत असणारे विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अौचित्य साधुन आम्ही वृक्षारोपन करण्याचा उपक्रम घेतला असल्याचे रिपाइंचे राज्य सचिव मा.हरेशभाई देखणे हे म्हणाले.जयंतीनिमित्त कोरोनाच्या काळात अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आयोजित केला असल्याचे खेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस अधिकारी राहुल लाड यांनी सांगितले.

डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महान होते.सर्वानी त्यांच्या विचाराचे आचरण करायला हवे. असे यावेळी आोव्हाळ साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया (आठवले),विटभट्टी विरोधी कृती समिती व निर्मिका फांऊडेशन याच्या वतिने करण्यात आले होते.शिरोली येथिल ठाकर वस्ती व इतर ठिकाणच्या 150 कुटुंबियांना अन्नधान्याचे किट(तांदुळ,गहु,साखर,चहापत्ती,साबन,कोलगेट,मिठ इ.)साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला रिपाइंचे राज्य सचिव हरेशभाई देखणे,राहुल लाड (API खेड पोलिस स्टेशन),भोसले (PSI खेड पोलिस स्टेशन),विक्रांत आोव्हाळ साहेब (असिस्टंट इंजिनिअर MSEB, खेड),एस.पी.चौधरी मँडम(वनरक्षक अधिकारी),
अर्जुन गोडसे (खेड पोलिस), ज्ञानेश्वर बोगाटे (फाँरेस्ट कर्मचारी) ,ऋषी वारे (खेड, पोलिस) ,मंगेश सावंत (मनविसे उपाध्यक्ष पुणे जिल्हा),जयाताई दजगुडे (माजी उपसरपंच ,शिरोली) इ.यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.

यावेळी उपस्थितांना मास्क तसेच सँनिटाईज देखिल वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला नवशक्ति तरुण मंडळाचे अध्यक्ष संजय एकनाथ सावंत,रविंद्र (बबन) सावंत ( उपाध्यक्ष , न.त.मं)राहुल सावंत,निर्मिका फाँऊडेशनच्या सचिव निर्मला देखणे,प्रमिला पवळे,शशिकला उमाप,दत्ताशेठ वाळुंज,योगेश उमाप,अतुल सावंत,अँड.संदिप मलगे,शेखर सावंत,दिपाली शिवेकर,महेश मलगे,सिमा सावंत,जयश्री सावंत,संगिता बत्ताले,बबन मलगे,जयश्री सावंत,बाबु मलगे ,शंकर कडाळे इ.कार्यकर्ते व शिरोली गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleरेमडेसिवीर इंजेक्शन तालुक्याला कमी पडून देऊ नका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची प्रशासनाकडे मागणी
Next articleडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन