डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

दिनेश पवार,दौंड

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त दिपकभाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष रिपाइं (आंबेडकर) आणि डी.बी.एन ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिराचे उदघाटन दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यामध्ये 96 रक्तदात्यांनी दौंड मध्ये रक्तदान केले.

या शिबिरात पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांनी पंचावन्न वे रक्तदान केले,तसेच खडकी रावणगाव येथे पंचशील युवक संघ व रिपाइं (आंबेडकर) व डी. बी.एन ग्रुप च्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले,यामध्ये 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे,उपक्रमास रिपाइं (आंबेडकर) व डी. बी.एन ग्रुप चे अध्यक्ष सचिन भाऊ खरात व रिपाई (आंबेडकर) दौंड शहराध्यक्ष प्रविण धर्माधिकारी,पत्रकार सुरेश बागल, विठ्ठल शिपलकर उपस्थित होते व उपक्रम यशस्वी करण्यामागे पंचशील युवक संघाचे युवानेतृत्व वैभवदादा शिंदे व सुरज शिंदे प्रकाश शिंदे ऋषिकेश शिंदे अक्षय शिंदे भीमभूषण शिंदे आशिष शिंदे परशुराम शिंदे राहुल शिंदे शाम शिंदे रोहित शिंदे किरण शिंदे सनी कोकाटे विक्रम देवकर वैभव भंडलकार अभि उबाळे विशाल शिंदे भारत शिंदे शिश्रुत शिंदे करण शिंदे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleशिरोली येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वृक्षारोपण व गरजुंना अन्नधान्याचे वाटप
Next articleऑक्सीजन बेड आणि वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे दैनिक प्रभातचे उपसंपादक श्रीकृष्ण पादीर यांच्या पत्नीचे झाले दुर्दैवी निधन