दौंड शुगर येथे कोविड लसीकरण यशस्वी

दिनेश पवार,दौंड

प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव राजे अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बोरिबेल यांचे मार्फत बुधवार दि. 14 एप्रिल रोजी दौंड शुगर (आलेगाव )येथे कोविड लसीकरणाचे सत्र यशस्वीपणे पार पडले,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते या सत्राचे उदघाटन करण्यात आले,यावेळी पूर्ण वेळ संचालक गायकवाड साहेब,आलेगाव चे पोलीस पाटील योगेश बोबडे,विजय मराडे उपस्थित होते.


हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुमित सांगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय पोतन, आरोग्य सेविका स्वाती निकम,प्राथमिक शिक्षक महेश केंजळे , संतोष पवार, आशा सेविका कविता जाधव,राणी काळे यांचे सहकार्य लाभले,या संपूर्ण लसीकरण कार्यक्रमात एकूण 347 लाभार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला
वाढत्या कोरोना चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कोविड लस घेणे अत्यंत गरजेचे आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास न ठेवता आपल्या सुरक्षेसाठी लस घेणे गरजेचे आहे,लस ही अत्यंत सुरक्षित असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे, त्यामुळे सर्वांनी लस घ्यावी तसेच लस घेतली तरी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे,वेळोवेळी हात स्वच्छ करणे गरजेचे आहे, आपली सुरक्षा आपल्या हातात या तत्वाने प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे

Previous articleपवनमावळ परिसरात डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी
Next articleदहा बेडचे आयसोलेशन सेंटर चालु- सरपंच सुरज चौधरी