दहा बेडचे आयसोलेशन सेंटर चालु- सरपंच सुरज चौधरी

अमोल भोसले,उरुळी कांचन

पेठ (ता.हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दहा बेडचे आयसोलेशन सेंटर चालु करुन पेठ गावातील पॉझिटीव्ह रुग्णाना हॉस्पिटल मधे बेड न भेटने व इतर नाहक त्रास होते व आयसोलेशन सेंटर चालु केल्यामुळे गावा मधील पॉझिटीव्ह रुग्णांना त्याचा फायदा होईल अशी माहिती सरपंच सुरज चौधरी यांनी दिली. आयसोलेशन सेंटर चालु करण्यास सर्वानीच मदत केली. याप्रसंगी पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी ,सर्जेराव चौधरी, धनंजय चौधरी, वर्षाराणी निलेश चौधरी, तानाजी चौधरी, सुजित चौधरी, दादासाहेब आढाव, तुळशीराम चौधरी, गणेश गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे स्वतः काळजी घ्यावी. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना आता ग्रामीण भागातील खेडोपाडयातही रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली आहेत म्हणून प्रत्येकाने यासाठी सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करुन योगदान देणे गरजेचे असल्याचे मत सरपंच सुरज चौधरी यांनी सांगितले.

Previous articleदौंड शुगर येथे कोविड लसीकरण यशस्वी
Next articleपवनानगर मध्ये संचारबंदी फक्त कागदावरच..