बीट मार्शल चोवीस तास मदत सेवेचा लोकार्पन सोहळा संपन्न

अमोल भोसले, उरुळी कांचन

लोणी काळभोर (ता.हवेली) पोलिस ठाण्या अंतर्गत उरुळी कांचन दूरक्षेत्रातील आवश्यक संख्याबळ उपलब्ध करुन गुन्हेगारी, ट्राफिकच्या समस्या व पुणे – सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनावर शहरात ज्या प्रकारे कारवाई केली जाते त्याप्रमाणे या हद्दीतील गुन्हेगारी ,वाहतुक नियंत्रण, अर्थिक, सायबर गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली जाईल असे मत पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता केले.

लोणी काळभोर पोलिस स्टेशन अंकित उरुळी कांचन (ता. हवेली ) येथे बीट मार्शल या जनतेला चोवीस तास पोलिस मदत सेवेचा लोकार्पन सोहळ्याच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमिताभ गुप्ता बोलत होते. यावेळी युनिटच्या पोलिस पथकाला हिरवा झेंडा दाखवून गुप्ता यांनी बीट मार्शलचा शुभारंभ केला.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, परिमंडल पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस वाहतूक आयुक्त हडपसर विभाग कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी, दादाराजे पवार, पोलिस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, पोलिस हवालदार सचिन पवार, सोमनाथ चितारे, अमोल भोसले, रूपेश भगत, संदीप पवार, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन, ग्रामपंचायत सदस्य मयूर कांचन, सुनिल तांबे, सरपंच विठ्ठल शितोळे, एल.बी कुंजीर, सचिन सातव, दत्तात्रय काकडे, पोलीस पाटील विजय टिळेकर, वर्षा कड, दत्तात्रय चौधरी, मोहन कुंजीर, चंद्रकांत टिळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हडपसर विभागाचे सहायक पोलिस वाहतूक आयुक्त कल्याणराव विधाते यांनी केले तर सूत्रसंचालन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप यांनी केले व आभार प्रदर्शन वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले आहे.

Previous articleअरूण पाटे यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल
Next articleमाहेर संस्थेचे कार्य समाजातील सर्वचं घटकांसाठी प्रेरणादायी – विशाल भोसले