माहेर संस्थेचे कार्य समाजातील सर्वचं घटकांसाठी प्रेरणादायी – विशाल भोसले

गणेश सातव ,वाघोली

माहेर संस्थे मधील मुले हि माहेरचा आत्मा असून येथील कर्मचारी त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देतात.तसेच मानसिक तणावाखाली असणाऱ्या शारीरिक,मानसिक अत्याचार झालेल्या निराश अवस्थेतील महिला माहेर मध्ये येतात. ‘माहेर’मध्ये या महिलांना प्रेम,माया – आपुलकी,आधार मिळतो जो फक्त ‘माहेरच्या’ घरातच मिळु शकतो. याच आधाराने त्या आपल्या पूर्वजखमा भरु शकतात व आपल्या नवजीवनाची सुरुवात करु शकतात त्यांना येथे आत्मविश्वास, व्यवसायिक प्रशिक्षण, नैतिक आधार आणि प्रोत्साहन मिळते.त्यामुळेच माहेर संस्थेचे काम आदर्शव्रत वाटते असे प्रतिपादन हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट साहित्य कला सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष विशाल भोसले यांनी व्यक्त केले.

 

विशाल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने माहेर संस्थेच्या मांजरी खुर्द -आव्हाळवाडी येथील ‘वात्सल्यधाम’ प्रकल्पात दैनंदिन आवश्यक असणाऱ्या वस्तू भेट स्वरुपात देण्यात आल्या.
यामध्ये कोलगेट, साबण,तेल,कपडे पावडर ईत्यादी वस्तूचा समावेश होता.
याप्रसंगी माहेर संस्थेच्या संस्थापिका – संचालिका सि.ल्युसी कुरियन,अध्यक्षा हिराताई मुल्ला,पत्रकार अमोल भोसले,विकास गोते उपस्थित होते.

Previous articleबीट मार्शल चोवीस तास मदत सेवेचा लोकार्पन सोहळा संपन्न
Next article‘अधिस्वीकृती’ म्हणजे पत्रकारितेचा ‘पासपोर्ट’ नव्हे – एस.एम.देशमुख