काळुस गावात लसिकरणाला सुरुवात

चाकण- कोरोना या साथीवर मात करण्यासाठी काळूस गावातील ४५ वयोगटाच्या पुढील ३१० नागरिकांनी लस घेतली. या लसीकरण मोहिमेची गुरूवार (दि.०८) रोजी काळुस गावच्या सरपंच सौ धनश्री गणेश पवळे यांच्या हस्ते फित कापून सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी पं स मा.उपसभापती ज्योती आरगडे , पिंपळगाव केंद्रांच्या डाँक्टर इंदिरा पारखे मँडम,काळुसच्या मेघा वानखडे मँडम,व ईतर सहकारी स्टाफ मा.सरपंच श्री गणेशशेठ पवळे डायरेक्टर आण्णासाहेब मगर बँक, श्री योगेशशेठ आरगडे, धोंडिबा पवळे,चेअरमन बारकुशेठ जाचक,प्रा मोहनराव पवळे सर, पवनराजे जाचक, दत्ता पोटवडे, सौ आश्विनी आरगडे,सुनिल शेठ पोटवडे उपस्थित होते.

काळूस गावातील ४५ वयोगटाच्या पुढील ३१० नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला .या लसीकरणाला आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी,शिक्षकव स्ययंसेवक यांनी सहकार्य केले.राहिलेल्या नागरीकांना लस उपलब्धते नुसार देण्यात येणार आहे.नागरीकांनी लसिकरण करून घ्यावे असे आवाहन सरपंच सौ धनश्री पवळे यांनी केले आहे.

Previous articleआमदार अतुल बेनके यांची तमाशा कलावंतांना पाच लाखांची मदत
Next articleगुळाणी येथील सटवाजीबाबांचा उत्सव रद्द