गुळाणी येथील सटवाजीबाबांचा उत्सव रद्द

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील पुर्व भागातील श्रीक्षेत्र गुळाणी येथील सटवाजीबाबांचा शनिवार दि.१० आणि ११ एप्रिल रोजी होणारा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. भाविक भक्तांनी दर्शनासाठी येऊ नये, तसेच मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. करोनामुळे बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

सटवाजीबाबांचा उत्सव रद्द करण्यात आला असून भाविंकानी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष दिलीप ढेरंगे, सरपंच ज्ञानेश्वर ढेरंगे, उपसरपंच अमोल तांबे, उद्योजक माऊली ढेरंगे,यात्रा कमिटेचे अध्यक्ष भरत वायाळ, भिकाजी ढेरंगें,केतन तांबे, सर्जेराव पिंगळे,राम महाराज रोडे,संदिप पिंगळे,नाथा पाटील पिंगळे, चेतन पिंगळे, माऊली पिंगळे, रोहिदास ढेरंगे,नवनाथ ढेरंगे, सुनिल तांबे यांनी केले आहे.

Previous articleकाळुस गावात लसिकरणाला सुरुवात
Next articleपुणे-दौंड लोहमार्गावर बहुप्रतिक्षित मेमू धावली