आमदार अतुल बेनके यांची तमाशा कलावंतांना पाच लाखांची मदत

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या कुटुंबीयांकडून राज्यातील “तमाशा” कलावंतांसाठी आज नारायणगाव येथे ५ लक्ष रुपये देणगी देण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून नोटबंदी, अतिवृष्टी, दुष्काळी परिस्थिती, महापूर अशा एकापाठोपाठ एक आलेल्या संकटांचा सामना तमाशा कलाकारांनी मोठ्या हिंमतीने केला आहे.मात्र कोरोणा विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन झाल्यामुळे समाज प्रबोधन करणारी तमाशा कला व कलाकार मोठ्या हलाखीत जीवन जगत आहेत.

या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर ज्येष्ठ तमाशा फडमालक रघुवीर खेडकर व मंगला बनसोडे यांनी तमाशा कलाकारांच्या विदारक स्थितीचे वास्तव सांगितले होते. त्यानुसार त्यांनी तमाशा कलाकारांना मदतीचे आवाहन देखील केले होते. याच पार्श्वभूमीवर तमाशा फडमालक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील एकमेव आमदार अतुल बेनके यांनी या कलावंतांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत चेकद्वारे आज नारायणगाव येथे दिली.याबाबत आमदार अतुल बेनके व ज्येष्ठ तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी तमाशा परिषदेचे अध्यक्ष कलाभूषण रघुवीर खेडकर, उपाध्यक्ष आविष्कार मुळे, कार्याध्यक्ष संभाजी राजे जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष सुरज वाजगे, कला व सांस्कृतिक विभागाचे मोहित नारायणगांवकर, गणेश सांगवीकर आदी मान्यवर उपस्थित होते.