आमदार दिलीप मोहिते पाटील यांना कामगार मंत्री करण्याची जोरदार मागणी

राजगुरुनगर- राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना कामगार मंत्री करा अशी जोरदार मागणी सोशल माध्यमांमध्ये खेड तालुक्यातून करण्यात येत आहे आहे. सोशल मीडियावर “आदरणीय पवार साहेब खेड तालुक्याला न्याय द्या” या हॅशटॅगच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांना कामगारमंत्री करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.

खेड तालुका कामगारांचे माहेरघर असून चाकण एमआयडीसी,खेड सिटी मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात या कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असलेले नेतृत्व दिलीप मोहिते पाटील यांना कामगार मंत्री करण्याची कामगार वर्गातून व खेड तालुक्यातील जनतेतून जोरदार मागणी होत आहे

प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक असलेले आक्रमक नेतृत्व व सर्व सामान्य नागरिक व कामगारांच्या अडचणीं सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना कामगारमंत्री करून न्याय द्यावा असे सर्वसाधारण नागरिक व कामगांराचे मत आहे

Previous articleभारतीय पत्रकार संघाच्या दाैंड तालुकाध्यक्षपदी सुभाष कदम यांची निवड
Next articleजेसीबी मशीनचे ब्रेकर चोरी करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक