भारतीय पत्रकार संघाच्या दाैंड तालुकाध्यक्षपदी सुभाष कदम यांची निवड

दिनेश पवार,दौंड

भारतीय पत्रकार संघाच्या दौंड तालुका अध्यक्ष पदी सुभाष कदम यांची निवड करण्यात आली,
दाैंड तालुक्यातील आलेगावचे रहिवाशी व सी के मराठी न्यूजचे उपसंपादक सुभाष विनायक कदम सर यांच्या शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक, पर्यावरण रक्षण व संवर्धन व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची भारतीय पत्रकार संघाच्या दाैंड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भारतीय पत्रकार संघाचे कार्य हे पत्रकारांच्या हक्का साठी आहे, असे मत सुभाष कदम यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष एम.एस.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश संघटक अनिल साेनवणे,पुणे विभागीय अध्यक्ष कैलास पठारे,यांच्या अनुमतीने पुणे जिल्हा अध्यक्ष रमेशजी लेंडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.


यावेळी राजेगावच्या उपसरपंच सीमा शिताेळे,प्रहार जनशक्ती संघटनेचे दाैंड तालुकाध्यक्ष रमेशजी शिताेळे,भारतीय पत्रकार संघाचे पुरंदर तालुकाध्यक्ष सिकंदर नदाफ,प्रसिद्धी प्रमुख जयंत पाटील,दाैंड तालुका भाजपा युवा आघाडीचे सचिन खैरे,पत्रकार विठ्ठल माेघे,अतुल काळदाते यांच्यासह माेठ्या संखेने पत्रकार उपस्थित हाेते. उपस्थितांचे राजेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला.यावेळी सुभाष कदम म्हणाले की संघाने माझ्यावर साेपविलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून मी दाैंड तालुक्यातील पत्रकारांच्या व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे शेवटी ते म्हणाले.

Previous articleस्कॉटीश कड्यावर फडकावला तिरंगा
Next articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांना कामगार मंत्री करण्याची जोरदार मागणी