जेसीबी मशीनचे ब्रेकर चोरी करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत जेसीबी मशीनचे ब्रेकर चोरी करणाऱ्या एकास पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा महादेव अंबादास शेळके (रा. आव्हाळवाडी ,मोरे वाडा ,वाघोली ता. हवेली) यांने केला असल्याची गोपनीय बातमी दाराकडून माहिती मिळाल्याने महादेव अंबादास शेळके (रा. आवळवाडी ता. हवेली) याला लोणीकंद पोलिस स्टेशनचे हवा बाळासाहेब सकाटे ,पो काँ ऋषिकेश व्यवहारे यांचे मदतीने सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याने दि.२३ /३ /२०१९ रोजी लोणीकंद पुणे शहर यांचे हद्दीतून अशाच प्रकारचे जेसीबी मशीनचे आणखीन एक ब्रेकर चोरी करून नेल्याची कबुली दिली आहे सदर बाबत लोणीकंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपीकडून गुन्हा करते वेळी वापरण्यात आलेली जेसीबी मशीन ,सणसवाडी इथून चोरलेले जेसीबी मशीनची ब्रेकर , लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीतून चोरलेले जेसीबी मशीन ब्रेकर असा एकूण २७,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मोहिते , यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.नि.सचिन काळे , दत्तात्रय गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके , राजू मोमीन, अजित भुजबळ , मंगेश थिगळे, अक्षय जावळे यांनी केली आहे.

Previous articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांना कामगार मंत्री करण्याची जोरदार मागणी
Next articleनारायणगाव येथील वाईन शॉप चालकावर गुन्हा दाखल