अभिमन्यू गिरमकर यांची तालुकाध्यक्ष पदी निवड

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुका भारतीय जनता किसान मोर्चाच्या दौंड तालुका अध्यक्षपदी देऊळगाव राजे येथील सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू अर्जुन गिरमकर यांची नुकतीच निवड करण्यात आली, या निवडीचे पत्र दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते देण्यात आले.

आगामी काळात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी,विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ध्येयधोरणे व कार्य जन सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच पक्षाला अधिक मजबुत करण्यासाठी कार्य करणार असल्याचे अभिमन्यू गिरमकर यांनी सांगितले.

अभिमन्यू गिरमकर यांचे सामाजिक कार्यातील योगदान,युवकांच्या हक्कासाठी असणारे कार्य तसेच शेती क्षेत्रांतील आधुनिकता या सगळ्या गोष्टीतील योगदान पाहून ही निवड करण्यात आली आहे, या निवडीबद्दल परिसरातून समाधान व शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleकमान येथे कोविड-१९ लसीकरणास सुरवात
Next articleराजेगाव येथे वृक्षारोपण