कमान येथे कोविड-१९ लसीकरणास सुरवात

राजगुरुनगर- वाडा प्राथमिक आरोग्य केंद्र व कमान उपकेंद्र यांच्या माध्यमातून व कमान ता.खेड ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ सरपंच योगेश नाईकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

शनिवार दि.३ रोजी कमान उपकेंद्रात लसीकरणास सुरवात झाली असून,पहिल्याच दिवशी ८० नागरिकांनी लसीचा लाभ घेतला आहे.रविवारी सुद्धा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण सुरू असून,गावातील ४५ वयाच्या पुढील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.लस घेण्यासाठी पोटभर जेवन करून यावे व येताना बरोबर आधार कार्ड व मोबाईल नंबर घेवून यावे असे अहवान डाॅ.निखील अडकमोल वैदयकीय अधिकारी यांनी केले आहे.

लसीकरणासाठी डाॅ.काशीनाथ गायकवाड,डाॅ.अश्विनी ढोले,दौडंकर व्हि.एस.आरोग्य सेविका,प्रकाश पाटील आरोग्य कर्मचारी व सिंधूताई नाईकरे आशा सेविका मदत करत आहेत.

यावेळी राजगुरूनगर सहकारी बॅकेंचे संचालक व कमान ग्रामपंचायत सदस्य सतिष नाईकरे पाटील,मच्छिंद्र रोकडे, पुष्पा तान्हाजी नाईकरे, ग्रामसेवक रविंद्र पाटील व नागरिक उपस्थित होते.

Previous articleनागरिकांनी भीती न बाळगता लस घ्यावी-सरपंच संभाजी घारे
Next articleअभिमन्यू गिरमकर यांची तालुकाध्यक्ष पदी निवड