नागरिकांनी भीती न बाळगता लस घ्यावी-सरपंच संभाजी घारे

राजगुरूनगर- कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे, कोरोना लस पूर्णतः सुरक्षित असून नागरिकांनी भीती न बाळगता घ्यावी, असे आवाहन दावडीचे सरपंच संभाजी घारे यांनी केले आहे.

दावडी(ता. खेड) येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत ४५ वर्षापुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. उपसरपंच राहुल कदम,संतोष सातपुते ,अनिल नेटके, धनश्रीताई कान्हुरकर,पुष्पाताई होरे, प्रियांकाताई गव्हाणे , संगिता मैद, ग्रामविकास अधिकारी तानाजी इसवे  आदी उपस्थित होते

खेड पंचायत समितीचे सभापती भगवानशेठ पोखरकर, विजयसिंह शिंदे पा,धनंजय बापू पठारे, विशालशेठ पोतले यांनीही या ठिकाणी भेट दिली.

या लसीकरणाला सभापती भगवानशेठ पोखरकर यांच्यासह वाफगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ.सुरेश गोरे यांच्यासह  प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, शिक्षक व ग्रामंपचात मधील सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या लसीकरण केंद्राचा गावच्या नागरिकांना फायदा होणार आहे. दावडी येथे कोविड लसीकरण मोहीम सुरू झाल्याने नागरिकांना होणारा त्रास वेळ व पैसा वाचणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Previous articleजिल्हा आरोग्य समितीवर आमदार अशोक पवार यांची निवड
Next articleकमान येथे कोविड-१९ लसीकरणास सुरवात