गोणवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयातील साहित्याची अज्ञात चोरट्याकडून तोडफोड

प्रमोद दांगट, निरगुडसर

 गोणवंडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या कार्यालयास शासकीय सुट्टी च्या दिवशी ( दि. 27)रोजी कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने संस्थेत शिरून संस्थेतील लाकडी कपाटे, टेबल खिडक्या ,दरवाजे, शटर फोडतोड करून संस्थेच्या मालमत्तेचे नुकसान केली आहे याबाबत संस्थेचे प्राचार्य अशोक अनंत साबळे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .पोलिसांनी साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अशोक अनंत साबळे ( वय ४३ रा. मंचर सुलतानपूर ता.आंबेगाव जि. पुणे ) हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोणवडी येथे प्राचार्य म्हणून काम करत असून (दि.27 )रोजी शासकीय सुट्टी असल्याने ते मंचर येथे आपल्या घरी होते. घरी असताना त्यांना संस्थेचा पहारेकरी याने फोनद्वारे कळवले की मी सकाळी इंटरनेट चालू करण्यासाठी प्राचार्य कक्षाकडे गेलो असता मला प्राचार्य कक्षाचे दरवाज्याचे कडीकोयंडा तुटलेला दिसला त्यावेळी आतमध्ये जाऊन पाहिले असता लाकडी कपाट ,टेबल ,ड्रावर उघडे होते तसेच पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रिक मेकॅनिक लॅब ,तसेच आयसिटीएमएस लॅबचे दरवाजे तोडून आत मधील कपाटे फोडण्यात आली होती व कार्य शाळेच्या पाठीमागील बाजूकडील लोखंडी शटर तोडलेले दिसत असल्याचे त्यांनी प्राचार्यांना सांगितले. त्यावेळी फिर्यादी साबळे यांनी कार्यालयीन स्टाफला फोन करून सर्व माहिती दिली व प्राचार्य साबळे व स्टाफ यांनी घटनास्थळी जाऊन माल मत्तेची पाहणी केली असता संस्थेतील काही चोरीला गेले न्हवते मात्र संस्थेच्या मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान केले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.याबाबत त्यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleवयोवृद्ध व्यक्तींनी लसीकरण करुन घ्यावे- माजी सभापती सुजाता पवार
Next articleकोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी होम कोरोटाईन टाळावे – तहसीलदार रमा जोशी