कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी होम कोरोटाईन टाळावे – तहसीलदार रमा जोशी

प्रमोद दांगट निरगुडसर

आंबेगाव तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आजपर्यंत दररोजच्या आकडेवारीत रूग्णांच्या संख्येने शंभरी पार केलेली आहे.तालुक्यातील प्रशासना बरोबरच आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांनी तालुक्यातील रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध असल्यामुळे शक्यतो होम क्वारंटाईन न होता. रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहन आंबेगावचे तहसिलदार रमा जोशी यांनी केले आहे.

निरगुडसर येथे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.यापार्श्वभुमिवर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

तालुक्यात प्रत्येक दिवसाला रुग्ण संख्या वाढत आहेत त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरने टाळावे.नुसतेच गावे बंद ठेऊन समस्या सुटत नाही.तर कोरोना विरोधात लढण्यासाठी नागरीकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी सरपंच उर्मिलाताई वळसे-पाटील ,उपसरपंच सपना हांडे,ग्रा.पं.सदस्य आनंदराव वळसे-पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रविण खराडे,तलाठी विभुते ए.आर.,संतोष वळसे-पाटील,मा.सरपंच रामदास वळसे-पाटील राहुल हांडे, तंटामुक्त अध्यक्ष युवराज हांडे.उपस्थित होते.

Previous articleगोणवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयातील साहित्याची अज्ञात चोरट्याकडून तोडफोड
Next articleशिरूर तालुक्यातील बारा गावे राहणार सात दिवस बंद