वयोवृद्ध व्यक्तींनी लसीकरण करुन घ्यावे- माजी सभापती सुजाता पवार

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

वडगाव रासाई ते मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातील सादलगाव कुरुळी व वडगाव रासाई मधील ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेल्या ४५ वर्षावरील व्यक्तिंसाठी कोव्हीड लसीकरण सुरु करण्यात आले. असून यावेळी जिल्हा परिषदेच्या सभापती सुजाता अशोक पवार यांच्या उपस्थित लसीकरण करण्यात आले.यावेळी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

तसेच डॉक्टर नर्सेस आणि आशा सेविका यांचे सहकार्य मोलाचे लाभले असून वडगाव रासाई मध्ये कोरोना लसीकरण तीन दिवस होणार असून तरी जास्तीत जास्त वयोवृद्ध व्यक्तींनी कोरोना लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी केले.