पर्यटकांसाठी पॅराग्लाइडिंग एक आनंददायक साहसी खेळ:एका साहसवेड्या तरुणाची संघर्षमय कहाणी

बापुसाहेब सोनवणे- कहाणी पॅराग्लायडींगची आकांक्षापुढती गगन ठेंगणे या उक्तीप्रमाणे काही जण स्वप्न पाहतात परंतु प्रत्यक्षात स्वप्नपूर्ती साठी खूप कमी जण प्रयत्न करतात. असेच स्वप्न पाहिले छोट्या अवि ने….आकाशात उडण्याचे पक्षांप्रमाणे विमानांप्रमाणे विहार करण्याचे …त्यातून पुढे जाऊन जन्म झाला पराग्लायडिंग मध्ये पायोनीअर समजल्या जाणाऱ्या टेम्पल पायलट्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पराग्लायडिंग स्कुल चा….

खरं तर पराग्लायडिंग हा खेळ साहसी खेळांमध्ये गणला जातो साधारणपणे 25 वर्षांपूर्वी फक्त परदेशातच या खेळाला मागणी होती.परंतु भारतात हा खेळ त्यातही पुण्याजवळ येण्यामागे एका साहसवेड्या तरुणाचा संघर्ष आहे.

हरियाणा मधील छोट्या खेड्यात जन्मलेल्या अविला लहानपणापासूनच आकाशात उडणाऱ्या विमानांचे प्रचंड आकर्षण ….तसेच हवेत मस्त आणि स्वच्छन्द विहार करणाऱ्या पक्षांकडे अवि तासनतास पाहत बसे …इतकं की आई त्याला शोधायला येई तेव्हा स्वारी आकाशाकडे डोळे लावून मुक्त विहार करणाऱ्या पक्षांच्या हालचाली टिपण्यात मग्न असे.

पुढे याच मुलाला त्याच्या अंगी असणाऱ्या क्षमतेवर एनडीए (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) मध्ये प्रवेश मिळाला. त्याने पुढे एसीसी अकादमी कॅडेट मध्ये कॅप्टनपद मिळवले. त्याचबरोबर प्रतिष्ठित समजले जाणारे प्रेसिडेंट गोल्ड मेडल मिळवले. त्यानंतर हाच तरुण लढाऊ पायलट म्हणून आयएएफमध्ये दाखल झाला.या सगळ्यामुळे त्याचे हवेत उडण्याचे स्वप्न पूर्ण झाले.परंतु कुठेतरी मनात रुख रुख होतीच काही तरी कमी होते….मग काही वर्षे नोकरी केल्यानंतर हिमालयात आत्मिक शांती साठी आणि आध्यात्मिक उन्नती साठी भ्रमंती केली.तिथेच त्यांना काही पराग्लायडिंग करणारे परदेशी लोक भेटले तेव्हा भारतातील लोकांना ही कला फारशी अवगत नव्हती अवि मलिक त्या खेळाच्या एक प्रकारे प्रेमातच पडले.त्यांचा शोध तेथेच संपला त्यांनी स्वतः तेथे परदेशी पाहुण्याकडून ही कला शिकून घेतली .पण महाराष्ट्रात ही कला वाढवण्यासाठी त्यांना प्रचंड प्रमाणात संघर्ष करावा लागला कारण त्यावेळी नुसता दोऱ्याने बांधलेला पातळ प्लास्टिकचा कागद माणसाला आकाशात उडवू शकेल यावर लोकांना विश्वास बसेना.

हिमालयातील बर्फाच्छादित डोंगरांवर उडत असतानाच त्यांनी हे स्वप्न पाहिले की खेळ सर्व भारतीयांना सहज उपलब्ध आणि परवडणारा असावा. ते महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी 23 वर्षांपूर्वी कामशेत येथे नवीन उड्डाण करणारी जागा शोधली. . खरं तर त्यांना सापडलेल्या पहिल्या उड्डाण जागेचे नाव त्यांनी शेजारच्या शेलार नावाच्या शेतकर्‍याच्या नावावरून “,शेलार हिल” ठेवले . योगायोगाने, शेलार काकांचे दोन नातू टेम्पल पायलट या अवि मलिक यांच्या संस्थेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणित शिक्षक आणि व्यावसायिक पायलट आहेत.

 पत्नी अनिता देशपांडे यांच्यासमवेत तळेगाव येथे टेम्पल पायलट ही शाळा स्थापन केली. आज टेम्पल पायलट्स एक नोंदणीकृत स्कूल आहे, यांचा APPI (एसोसिएशन ऑफ प्रोफेशनल पायलट्स अँड इन्स्ट्रक्टर, स्वित्झर्लंड) सह परवाना क्रमांक 9 आहे. त्यांच्याद्वारे निश्चित केलेल्या प्रमाणक मानदंडांचे सर्व जगभरातील संस्था पालन करतात.
म्हणजेच टेम्पल पायलट्स हे त्यांच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त एपीआय पायलट परवाना प्रदान करण्यास अधिकृत आहेत ज्यात एफआयआय-आयपीपीआय रेटिंग कार्ड देखील आहे, हे कार्ड एसीआयने अधिकृत केले आहे (एरोक्लब ऑफ इंडिया). टेंपल पायलट्स हे दक्षिण पूर्व आशियातील एक अग्रगण्य पॅराग्लाइडिंग प्रशिक्षण शाळा आहे जिथे प्राथमिक ते प्रगत सर्वोत्तम पॅराग्लाइडिंग शिक्षण दिलं जातं.

 

कामशेतच्या आजूबाजूच्या नवीन फ्लाइंग साइट्सवर प्रशिक्षण घेण्यास सुरूवात करताना अवि मलिक यांनी आजूबाजूच्या तरुणांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहिली.तरूण मुलांना उडण्याची उत्सुकता आहे हे त्यांनी जाणले.मग ते तरुण कमी शिक्षित असले तरीही त्यांची क्षमता आणि त्यांची शिकण्याची आवड स्पष्टपणे पाहिली. या तरुण ‘मावळ्यांची’ एक टीम तयार केली त्यांना उत्तम प्रशिक्षण दिले आणि आज ही तरुण मुले खेड्यातील असूनही परदेशी लोकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण देतात. योग्य दिशानिर्देश दिल्यास आपल्या ग्रामीण तरुणांची ही ऊर्जा योग्य मार्गाने वापरता येते त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात हे यावरून दिसून येते.

पुण्याजवळील कामशेत हे वर्दळीचे पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले. सुरक्षित आणि सक्षम पायलट बनविण्यासाठी आणि पॅराग्लाइडिंगला पर्यटकांसाठी एक आनंददायक साहसी खेळ बनविण्यासाठी केंद्र तयार करण्याची अवी मलिक यांची दूरदृष्टी अशा रीतीने फळाला आली.

आता पाच पॅराग्लाइडिंग शाळा आणि अनेक तांडेम ऑपरेटर तळेगाव मध्ये आहेत.जेथे फक्त स्थानिक तरुण काम करतात. आणि केवळ भारतच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रशिक्षण देतात.ऑक्टोबर ते मे या कालावधीत उड्डाण करणाऱ्या हंगामात दरवर्षी हजारो लोक पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेत असतात आणि हजारो लोक तांडम (दोन आसनी) जॉयराइड्सचा आनंद घेतात.
टेम्पलपायलट्स अनेक वर्षांपासून सैन्य, नौदल आणि एअरफोर्सकडून सेवा कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देत आहेत.

टेलिग्राफी आणि योग्य हवामान केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरही पॅराग्लायडिंगसाठी अग्रणी केंद्र बनू शकल्यास टेम्पल पायलटसारखी उत्कृष्ट केंद्रे राज्य व राज्यातील अनेक पर्यटनस्थळांवर पुन्हा तयार केली जाऊ शकतात.

पर्यटन, क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयांकडून स्वारस्य असलेल्या प्रोजेक्टवर त्यांनी स्वतःचे कौशल्य सिद्ध केले आहे आणि अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सरकारकडून भरिव मदतीची आवश्यकता आहे.संपर्कासाठी इंटरनेटवर टेम्पल पायलट नावाने सर्च केल्यास सर्व माहिती मिळते

Previous articleपोलिस असल्याचा बनाव करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले
Next articleजवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत सागर उढाणे ला यश