जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत सागर उढाणे ला यश

Ad 1

राजगुरूनगर- देशभरातील विविध जिल्ह्यांमधील जवाहर नवोदय विद्यालयांसाठी घेण्यात आलेल्या इयत्ता नववी परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हानिहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली असून,या परिक्षेत खेड तालुक्यातील दोंदे येथील सागर उढाणे या विद्यार्थ्यांने यश मिळवले आहे

केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववी प्रवेशासाठी देशभर प्रवेश पूर्व परीक्षा २४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी ७ जागांसाठी ४०० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यापैकी अनेक अर्ज बाद ठरले होते. तर प्रत्यक्ष ३५९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. प्रवेशासाठी प्रचंड चुरस असते. त्यामुळे या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष असते. परीक्षेतून इंग्रजी, हिंदी, गणित आणि विज्ञान अशा चार स्तरावर विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता तपासली जाते. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पात्र ठरविल्या जाते. प्रवर्गनिहाय निवड यादी जाहीर करण्यात आली.यामध्ये खुल्या संवर्गाच्या ४ जागा पैकी ३ जागावर खेड तालुक्यातील विद्यार्थी पात्र ठरले.भैरवनाथ विद्यालय दोंदे येथील सागर सचिन उढाणे हा विद्यार्थी पात्र ठरला. त्याला मुख्याध्यापक गारगोटे सर व इतर सह शिक्षकांनी मार्गदर्शन केले.