रेटवडीत १०५ जणांचे मोफत कोव्हिड लसीकरण

राजगुरूनगर- रेटवडी (ता.खेड) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रेटवडी यांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत रेटवडी यांच्या सहकार्याने ४५ वर्षावरील व्यक्तींना covid -19 च्या मोफत लसीकरण वाटपाची सुरवात ग्रामपंचायत हॉल रेटवडी येथे करण्यात आली . यावेळी सुरवात रेटवडी गावचे मा. आदर्श सरपंच द्वारकानाथ टिजगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रेटवडी गावचे ग्रामपंचायत सदस्य दिलीप डुबे , किरण पवार , खंडू पवळे,मा. उपसरपंच नवनाथ पवार , उद्योजक अतुल थिटे पोलीस पाटील, उत्तमराव खंडागळे , तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश वाबळे , सुभाष हिंगे , नवनाथ गोसावी हे उपस्थित होते.

यावेळी लसीकरण करून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रेटवडी येथील , डॉ ज्योती जाधव , नर्स श्रीमती ठाकूर के. एम , आशावर्कर अनिता डुबे , मेघा डुबे , अश्विनी डुबे , मिसबा इनामदार , अनिता खंडिझोड , नंदाबाई खंडागळे , नफिजा इनामदार , सुपरवायझर यादव साहेब यांनी सहकार्य केले .

दिवसभरात रेटवडी गावातील १०५ व्यक्तींना covid-19 च्या लसीचे वाटप करण्यात आले त्यामध्ये ४५ वर्षापुढील अनेक पुरुष, महिला ,अपंग व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे येथून पुढेही आरोग्य उपकेंद्र रेटवडी यांच्या माध्यमातून लसीकरणाचा वाटप चालू राहणार आहे .

Previous articleबैलगाडीतून लग्नाच्या मांडव डहाळ्याची मिरवणूक काढल्याने दोघांवर गुन्हा दाखल
Next articleपोलिस असल्याचा बनाव करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले