बैलगाडीतून लग्नाच्या मांडव डहाळ्याची मिरवणूक काढल्याने दोघांवर गुन्हा दाखल

प्रमोद दांगट

धामणी (ता. आंबेगाव) येथे (दिं 29) रोजी बैलगाडीतून लग्नाच्या मांडवाच्या डहाळ्यांची मिरवणूक काढून 25 ते 30 लोकांची गर्दी जमविल्या प्रकरणी दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन व साथीचे रोग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरणा आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून (दि. 29 रोजी ) दुपारी दिडच्या सुमारास धामणी गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना धामणी गावच्या हद्दीत लग्नाच्या कार्यक्रमाची मिरवणूक चालू असल्याची माहिती पोलिसांना कळाली. त्या वेळी पोलीस घटनास्थळी गेले असता आकाश जाधव यांच्या लग्नाच्या मांडवाचे कार्यक्रम करिता बैलगाडीतून पंचवीस ते तीस लोकांचा एकत्र जमून कुठलीही परवानगी न घेता मिरवणूक काढून भडाऱ्याची उधळण करत असतानाच दिसून आले.

या प्रकरणी बापूसाहेब तुकाराम जाधव ,आकाश बापूसाहेब जाधव ( दो. रा.धामणी ता.आंबेगाव पुणे ) यांच्याविरोधात पोलीस हवालदार डावखर यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleकांदा विकून आलेले पैसे व गाडी भाड्याचे पैसे घेऊन ड्रायव्हर फरार
Next articleरेटवडीत १०५ जणांचे मोफत कोव्हिड लसीकरण