शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण भोवले; देवगावच्या विद्यमान सरपंच, उपसरपंचासह दोन महिला सदस्यांचे पद रद्द

प्रमोद दांगट निरगुडसर

देवगाव (ता. आंबेगाव) येथील विद्यमान सरपंच उपसरपंच व दोन महीला सदस्यांना शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याने जिल्हाअधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्याच अपात्र ठरवले आहे.
देवगाव (ता. आंबेगाव) येथील विद्यमान सरपंच योगिनी दिलीप खांडगे उपसरपंच दत्तात्रय महादु खांडगे व ग्रामपंचायत सदस्यां द्वारका मच्छिंद्र कोकणे यांच्या नातेवाईकांनी व ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई विठोबा खांडगे यांनी स्वता शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात यावे. यासाठी देवगावच्या माजी सरपंच उज्वला बाबाजी गावडे यांनी जिल्हाअधिकारी पुणे यांच्या कडे अर्ज दाखल केला होता.

उज्वला गावडे यांच्या वतीनी अँड.एम.ए.कोकणे व अँड. पी.जी.बांगर यांनी काम पाहिले. या विवाद अर्जावर जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेतली.या सुनावणी दरम्यान देवगावच्या सरपंच योगिनी दिलीप खांडगे यांच्या सासुबाई राधाबाई पाटील बुवा खांडगे यांनी शासकीय गायरान जमिनी गट क्रमांक 1/1मध्ये ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 218 व 218/1 अतिक्रमण करुन बांधली आहे. तसेच उपसरपंच दत्तात्रय महादु खांडगे यांच्या पत्नी सुखेशिनी दत्तात्रय खांडगे यांनी शासकीय गायरान गट क्रमांक 166 मध्ये ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 204/1 व नोंद नसलेली एक मजली इमारत व त्यांच्या पुढे पत्राशेड अतिक्रमण करुन बांधली आहे. तर ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई विठोबा खांडगे यांची स्वताच्या नावे असलेली ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 211 ही शासकीय गायरान गट क्रमांक 166 मध्ये अतिक्रमण करुन बांधली आहे. ग्रामपंचायत सदस्या द्वारका मच्छिंद्र कोकणे यांच्या सासुबाई छबुबाई व कुसुमबाई लक्ष्मण कोकणे यांच्या नावे ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 16 शासकीय गायरान गट क्रमांक 1/1 मध्ये अतिक्रमण करुन बांधली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चारही ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरण्याची मागणी तक्रार दाखल करणारे अर्जदार माजी सरपंच उज्वला बाबाजी गावडे यांनी केली होती.

.
यावर जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच तहसीलदार आंबेगाव व गट विकास अधिकारी आंबेगाव यांचा या अतिक्रमण बाबतीत अहवाल मागवुन घेतला.व त्यानंतर सरपंच योगिनी दिलीप खांडगे उपसरपंच दत्तात्रय महादु खांडगे, ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई विठोबा खांडगे व द्वारका मच्छिंद्र कोकणे यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्यात येत आहे. असा निर्णय दिला आहे.

Previous articleचिंचवडचे नुतन पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज यांच्या हस्ते ‘होप’चे मानवतेचे दिप प्रज्वलित
Next articleलोणी येथे बेकायदा ताडी विक्री करणार्‍यावर मंचर पोलिसांची कारवाई