लोणी येथे बेकायदा ताडी विक्री करणार्‍यावर मंचर पोलिसांची कारवाई

Ad 1

प्रमोद दांगट , निरगुडसर

लोणी (ता.आंबेगाव) येथील डॉक्टर भोसले हॉस्पिटल च्या बाजूला घराच्या आडोशाला बेकायदा ताडी विक्री करणार्‍यावर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्या जवळून 1,800 रुपये किमतीचा ताडीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी महादेव बबन भागवत वय ५४ रा. पारगाव याच्यावर मुंबई प्रॉव्हिजन कायदा कलम ६५ ई प्रमाणे पोलीस जवान टी. एस. मोरे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान तानाजी हगवणे करत आहे.