चिंचवडचे नुतन पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज यांच्या हस्ते ‘होप’चे मानवतेचे दिप प्रज्वलित

पुणे येथील होप फाऊंडेशनच्या वतीने एचआयव्ही बाधित बालकांना मदत केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात शंभराहून अधिक मुलांना होप फाउंडेशनच्या वतीने पौष्टिक आहार पुरविला जात असून यात पुणे, पिंपरी चिंचवड, गडहिंग्लज, कोल्हापूर, इचलकरंजी व बारामती येथील मुलांना मदत केली जाते .या मुलांना सरकार कडून औषधे मिळतात मात्र सकस आहार मिळत नाही हा आहार पुरविण्यासाठी होप फाऊंडेशनची धडपड सुरू आहे.

प्रत्येक महिन्यास फाऊंडेशन तर्फे मुलांना सकस आहार पुरविला जातो या महिन्याचा सकस आहार चिंचवडगाव पोलीस चौकीचे नुतन पोलीस उपनिरीक्षक सुधीर दिनकर वाळुंज यांच्या हस्ते चिंचवडगाव पोलीस चौकी येथे देण्यात आला यावेळी फाऊंडेशनच्या वतीने सुधीर वाळुंज यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस हवालदार जगताप व पोलीस नाईक डामसे व सर्व स्टाप यांच्या कडून होप फाऊंडेशनच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे आयोजन होप फाऊंडेशनचे पुणे विभाग प्रमुख विनायक खोत यांनी केले व प्रास्ताविक आशा घोडके यांनी केले. आभार अनिल सुतार यांनी मानले.कार्यक्रमास होप फौंडेशनचे शिवाजी देसाई, अभिजित आजगेकर व पोलीस चौकीचे अमूल्य योगदान लाभले.

यावेळी पोलीस हवालदार जगताप पोलीस हवालदार गायकवाड पोलीस नाईक डामसे व इतर स्टाफ होते.

Previous articleचारित्र्याच्या संशयावरून पत्नीला कुर्‍हाडीने मारहाण
Next articleशासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण भोवले; देवगावच्या विद्यमान सरपंच, उपसरपंचासह दोन महिला सदस्यांचे पद रद्द