समाजातील वंचित घटकांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा- गटविकास अधिकारी सुधीर भागवत

पवनानगर – ग्रामिण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी सेवाभावी वृत्तीने तळागाळापर्यंत पोहचल्यास ग्रामिण भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकले तर समाज उपयोगी संस्थेने अधिक ताकदीने काम केल्यास गाव विकासाच्या गाढा अधिक गतीने होईल असे मत ठाकुरसाई येथे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी गावातील नागरिकांना एस.एल्.के ग्लोबल सोलुशन व कर्वे सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जलशुध्दीकरण प्रकल्पाचे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त केले.

यावेळी प्रिया अमीन ,दीप्ती कांबळे,डॉ. महेश ठाकुर, वैद्यकीय अधिकारी राजेंद्र मोहिते सरपंच नारायण बोडके, उपसरपंच धर्मेंद्र ठाकर, ग्रामपंचायत सदस्य रामदास खैरे,माजी सरपंच किसन खैरे, दत्तात्रय ठाकर,राजु ठाकर, प्रकाश ठाकर,रवी ठाकर,सौरभ देवी, ग्रामसेविका नंदा बाबर, अंगणवाडी सेविका संगिता कालेकर,गुरु स्वामी,चयन पारधी,अमोह साठे, गणेश सुर्यवंशी,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना एस.एल.के चेअरमन गोपाल अमिन म्हणाले कि ग्रामिण भागातील नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा स्वच्छता, आरोग्य, कौटुंबिक विकास या बाजु सांभाळून गावपण टिकवणे ही काळाची गरज आहे गावातील विकासाचा ध्यास घेऊन संस्था आणि ग्रामस्थ यांनी पुढील काळात काम करण्याचे आवाहन केले

दिप्ती कांबळे म्हणाल्या की मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबरच संस्कार दिले पाहिजे आपण अनेक ठिकाणी गुंतवणूक करतो असतो परंतु आपले कुटुंब आपली मुलं हीच खरी भविष्याची महत्वाची गुंतवणूक आहे यासाठी वेळ दिला पाहिजे ध्येय निश्चित केल्यास यश नक्कीच मिळते योग्य मार्गदर्शनातुन प्रयत्न केले पाहिजे. संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी दिली.

या संस्थेच्या माध्यमातून गावातील कचरा व्यवस्थापन, शालेय विद्यार्थ्यांना ई लर्निग सेट,महिलांना कापडी पिशव्या बनविण्यासाठी प्रशिक्षण, या भागातील स्थानिकांना कृषी पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रशिक्षण या सारख्या अनेक उपक्रम राबविले असुन महिला, तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे याच उद्देशाने पुढील काळात कामकाज करण्यासाठी भर दिला जाणार आहे यावेळी सुत्रसंचलन गुरु स्वामी यांनी केले तर आभार सरपंच नारायण बोडके यांनी मानले

Previous articleकायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी प्राधान्य देणार : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
Next articleनगरसेवक सुदामभाऊ शेवकरी यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रं १३ मधील विविध कामांचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन